महाराष्ट्रात नमो उद्यान : एक कोटीचा निधी

विभागीय स्पर्धेचेही आयोजन : कोटींची बक्षिसे

0
224
Deputy Chief Minister Eknath Shinde said that the Maharashtra government has announced an ambitious scheme on the birthday of Indian Prime Minister Narendra Modi
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राज्यातील सर्व ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘नमो उद्यान’ विकसित करण्यात येणार असून, प्रत्येक उद्यानासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना “वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजना” अंतर्गत राबविण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करताना सांगितले की, “ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने ही भेट दिली आहे. या उपक्रमातून शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांसाठी पर्यावरणपूरक आणि आरोग्यवर्धक सुविधा निर्माण होतील. ही योजना शहरांमध्ये आधुनिक, आरोग्यवर्धक आणि पर्यावरणपूरक जागा निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..”

योजनेचे तपशील
  • राज्यातील ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित केले जाणार.

  • प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर.

  • उद्यानांमध्ये खेळण्याची साधने, व्यायाम क्षेत्र, सौंदर्यीकरण, पर्यावरणपूरक सुविधा यांचा समावेश.

नमो उद्यान स्पर्धेतील विजेत्यांना काय मिळणार ?

प्रत्येक विभागातून निवडल्या जाणाऱ्या नगरपरिषद / नगरपंचायतींना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी आणि १ कोटी रुपये अतिरिक्त विकास निधी देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून पुढील वर्षभरात सर्व उद्याने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
—————————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here