काय सांगताय ….! तामिळनाडूत कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात; बातमीत बघा नेमक काय म्हणायचं एम.के. स्टॅलिन यांना

0
47
Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवत ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे नेते सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आले आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, स्टालिन यांनी पक्षाच्या जिल्हा सचिवांशी संवाद साधताना, “सध्याचे सरकार कधीही कोसळू शकते. पक्षाने कोणत्याही क्षणी निवडणुकीसाठी सज्ज राहावे,” असे निर्देश दिले आहेत. त्यांनी हा पराभव तात्पुरता असल्याचे सांगत, “डीएमके पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वासही व्यक्त केला.

स्टालिन यांनी पुढे सांगितले की, २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबतच पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्ष संघटनेने आतापासून तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

सोशल मीडियामुळे टीव्हीकेचा विजय : स्टालिन

स्टालिन यांनी टीव्हीकेचे नाव न घेता आरोप केला की, “सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव टाकण्यात आला आणि त्याचा फायदा निवडणुकीत झाला.” विशेषतः तरुण आणि मुलांच्या माध्यमातून कुटुंबांवर प्रभाव टाकण्याची रणनीती वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

ही बाब आमच्या लक्षात आली नव्हती. मात्र आता डीएमके अधिक सतर्क राहील. सोशल मीडियावरून होणाऱ्या अशा प्रचाराला उत्तर देण्यासाठी पक्षाने स्वतंत्र रणनीती आखली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आघाडीतील पक्षांमुळे निर्माण होऊ शकते संकट

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारला पाठिंबा देणारे व्हीसीके, सीपीआय, सीपीएम आणि आययूएमएल या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकार अडचणीत येऊ शकते. तसेच, एआयएडीएमकेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई झाल्यासही राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

डीएमकेकडून ३६ सदस्यीय समिती

विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी डीएमकेने ३६ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला राज्यातील सर्व २३४ विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करून कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

स्टालिन यांनी समिती सदस्यांना संबोधित करताना, “हा केवळ औपचारिक उपक्रम नसून पराभवाची मूळ कारणे शोधण्याचा गंभीर प्रयत्न आहे,” असे सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here