शिवम प्रतिष्ठानमुळे कोडोलीतील एका वृद्ध महिलेला मिळणार हक्काचे घर..

0
421
An elderly woman in Kodoli will get a proper house thanks to Shivam Pratishthan
Google search engine

पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज 

पतीचे आणि एकुलत्या एका मुलाचे अकाली निधन झालेल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील बिरदेव मंदिर येथे राहणाऱ्या नव्वद वर्षांच्या आक्काताई गावडे सून, सहा नातींचा सांभाळ करत जीवन व्यतीत करत आहेत. त्या ज्या घरात राहतात ते छोटेसे घरही मोडकळीस आले होते. त्यांना गरज होती ती हक्काच्या निवाऱ्याची आणि ती शिवम प्रतिष्ठानने पूर्ण केली आहे. या नवीन घराचा वास्तूशांती आणि गृहप्रवेश  आज शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक आणि निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील बिरदेव मंदिर येथे राहणाऱ्या नव्वद वर्षांच्या आक्काताई गावडे यांच्या पतीचे आणि एकुलत्या एका मुलाचे अकाली निधन झाले आहे. सून आणि सहा नातीचा सांभाळ करत बिकट परिस्थितीत या आजीबाई आपलं आणि आपल्या कुटुंबाचं जीवन व्यतीत करत आहेत. आक्काताई गावडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही तीन नातीचे विवाह करून दिले आहेत. अन्य नाती शिक्षण घेत आहेत. त्यांना गरज होती ती हक्कांच्या निवाऱ्याची, परस्थिती अभावी त्या पक्केघर बांधु शकत नव्हत्या. राहातं घर देखील मोडकळीस आल असुन्शिते कधी कोलमडेल अशी स्तिथी होती.

आजीच्या या विदारक परिस्थितीची दाखल घेऊन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक आणि निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोडोली येथील साधक अनिकेत केकरे, राहुल पाटील, अक्षय डोंबे, शिवराज जाधव यांनी पुढाकार घेऊन पन्हाळा, कोडोली, वारणा, सातवे परिसरातील शिवम साधक मित्र परिवाराच्या अथक परिश्रमातून दानशूरांच्या मदतीतून ३५० स्क्वेअर फुटाचे दोन भव्य खोल्यांचे चार लाख रुपये खर्च करून घराचे बांधकाम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करून दिले. शिवम प्रतिष्ठानमुळे कोडोलीतील एका वृद्ध महिलेला आता हक्काचे घर मिळाले आहे. या नवीन घराचा वास्तूशांती आणि गृहप्रवेश आज शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे संस्थापक आणि निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवम प्रतिष्ठान यांच्या या विधायक उपक्रमाचे वारणा कोडोली परिसरात कौतुक होत आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here