कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी दासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्प अर्पण करून डॉ. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
दरम्यान, डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी, तळसंदेच्या वतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठातही जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर, प्रा. डी. एन. शेलार यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.






