कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, रस्ते, शिक्षण व उद्याने विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.नागरिकांच्या तक्रारींचे विभागीय कार्यालय स्तरावरच तातडीने निराकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
अधिकृत हातगाड्यांना क्यूआर कोड देणे, अतिक्रमण केलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, अनधिकृत पाणी जोडण्यांवर कारवाई सुरू ठेवणे आणि रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले.
वॉरंटी कालावधीतील रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्यासह शहरातील सर्व रस्त्यांचे ऑडिट करण्याचेही निर्देश देण्यात आले. तसेच कमर्शियल प्रॉपर्टीचा शोध घेऊन नियमानुसार कर आकारणी व करवसुली तीव्र करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.






