डॉ.डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स..

0
25
Google search engine

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. विविध प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून विभागातील विद्यार्थ्यांना तब्बल ६८ जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. मोव्हेट कंपनीत सना मुजावर हिला ९ लाख रुपयांचे वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले.

लॉन्च्ड ग्लोबलमध्ये सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, एड्युव्हर्सिटी बंगळुरू येथे १०, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ८, इन्फोसिसमध्ये ६, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजमध्ये ४ आणि फोक्सवॅगन प्रा. लि.मध्ये ३ विद्यार्थ्यांची निवड झाली. याशिवाय एचपी, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्स, झंवर ग्रुप, फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज, डिलॉईट सायबर गुरुकुल प्रोग्राम, एक्सेलआर यांसह विविध कंपन्यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
पॅकेजच्या बाबतीत मोव्हेटमध्ये ९ लाख, एचपीमध्ये ८.५ लाख, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्समध्ये ७.२ लाख, लॉन्च्ड ग्लोबलमध्ये ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख आणि झंवर ग्रुपमध्ये ५.५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख तर मायक्रोलाइजमध्ये ४.८ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले.

विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार एआय-एमएल कौशल्यविकास, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन व सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग आणि प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग–महाविद्यालय सहकार्य आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या संधी मिळत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन प्राप्त असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्यासह डॉ. ए. के. गुप्ता, श्रीलेखा साटम, डॉ. संतोष चेडे, डॉ. एल. व्ही. मालदे आणि सर्व संबंधित प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व एआयएमएल विभागातील प्राध्यापक.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here