हातकणंगले येथे मोफत महाआरोग्य शिबिर; नागरिकांना तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा…

0
25
Google search engine

हातकणंगले : आमदार अशोकराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने हातकणंगले येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास आमदार अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच सुदेश मोरे, नगरसेवक सुभाष गोरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य रावसाहेब चौमुले, नगरसेवक रोहित निगवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी विशेष समन्वय व सहकार्य केले.

यावेळी आशा वर्कर्स, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवक तसेच वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी रुग्ण नोंदणी, मार्गदर्शन, तपासणीसाठी समन्वय आणि गर्दीचे नियोजन यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here