जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पंचगंगा हॉस्पिटलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम…

0
36
Google search engine

कोल्हापूर: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम आणि पंचगंगा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर व भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी स्तनपान हे बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तेजश्री तहसिलदार यांनी स्तनपानाची योग्य पद्धत व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ आईचे दूध देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विद्या काळे यांनी रोटरीच्या माध्यमातून पंचगंगा हॉस्पिटलला देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.
यावेळी मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी करून प्रसूती झालेल्या मातांची विचारपूस केली. तसेच मातांना ड्रायफ्रूट्सची पाकिटे देण्यात आली. कार्यक्रमास प्रदीप भारमल, अतुल भालेकर यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here