Google search engine

प्रसारमध्यम / दिग्विजय माळकर 

कुवैत सिटी : कुवैत ने गुरुवारी इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा आरोप करत त्याचा तीव्र निषेध नोंदवला. मध्यपूर्वेतील संघर्षविराम आधीच नाजूक अवस्थेत असताना या हल्ल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

कुवैतच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात इराणकडून कुवैतच्या भूभागावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा आम्ही कठोर शब्दांत निषेध करतो. हा अत्यंत धोकादायक तणाववाढीचा प्रकार आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकन लष्करानेही या हल्ल्याला संघर्षविरामाचे गंभीर उल्लंघन असे संबोधले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, इराणी सैन्याने होर्मूज सामुद्रधुनी परिसरात अमेरिकन सैन्य आणि व्यापारी जहाजांसाठी धोका निर्माण करणारे पाच आत्मघातकी ड्रोन सोडले होते. अमेरिकन सैन्याने हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. तसेच सहावा ड्रोन उड्डाण करण्यापूर्वीच रोखण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

यापूर्वी कुवैतच्या लष्कराने देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी शत्रूची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यशस्वीपणे पाडल्याची माहिती दिली होती. मात्र हे हल्ले नेमके कुठून झाले, याबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

कुवैतच्या लष्कराने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत सुरक्षा आणि सुरक्षिततेसंदर्भातील सरकारी सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. देशभरात ऐकू आलेले स्फोटांचे आवाज हे हवाई संरक्षण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

गुरुवारी याआधी अमेरिकेने होर्मूज सामुद्रधुनी परिसरात इराणच्या ड्रोन कारवायांवर हल्ले केले होते. अमेरिकेच्या मते, या कारवायांमुळे अमेरिकन सैन्य तसेच व्यापारी जहाजांना धोका निर्माण झाला होता.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here