Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक 

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध गोकुळ दूध संघ वर आजपासून प्रशासक नेमण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

गोकुळ दूध संघातील गैरकारभाराबाबत प्रशासक नेमण्याची मागणी यापूर्वी आमदार पाटील यांनी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निर्णयानंतर गोकुळच्या पुढील कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रशासक नियुक्तीनंतर संघातील व्यवस्थापनात काय बदल होतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here