प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
फ्रान्स सरकारने इशारा दिला आहे की युक्रेन आणि पश्चिम आशियातील युद्धांचा परिणाम आता थेट नागरिकांच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सिनेटमध्ये बोलताना सांगितले की, “आपण अनुभवत असलेल्या दोन युद्धांचा एक युक्रेन मध्ये आणि दुसरे Middle East मध्ये परिणाम फ्रेंच जनतेपासून लपवता येणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, संघर्ष जितका दीर्घकाळ चालेल तितका त्याचा परिणाम “विशेषतः सामान्य नागरिकांच्या खर्चावर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर” अधिक जाणवेल. त्यांनी या परिस्थितीला दरवाढ संकट (a price crisis) असे संबोधले.
लेकोर्नू यांच्या मते, हे संकट उत्पादनातील कमतरतेमुळे नसून आयातीत महागाईमुळे निर्माण झाले आहे. सागरी वाहतुकीतील अडथळे आणि ठप्प पडलेल्या चर्चांमुळे बाजारातील दर वाढत आहेत.
ऊर्जा क्षेत्रातील नफ्यांबाबत बोलताना त्यांनी टोटल एनर्जी (TotalEnergies) वर टीका करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे सांगितले. मात्र, असामान्य नफा झाल्यास त्याच्या पुनर्वाटपाचा प्रश्न उपस्थित होतो,” असेही त्यांनी नमूद केले.
लेकोर्नू यांनी स्पष्ट केले की, ही आर्थिक परिस्थिती गंभीर असून दीर्घकाळ टिकण्याची शक्यता आहे. सरकार प्रभावित घटकांसाठी लक्षित मदत सुरू ठेवेल आणि “कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,” असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
२१:१०-२९ एप्रिल २०२६





