Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर 

क्षिण लेबनॉनमधील माजदल झौन शहरावर मंगळवारी झालेल्या दोन सलग इस्रायली हवाई हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बचावासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

लेबनॉन सिव्हिल डिफेन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहिल्या हल्ल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी गेलेले तीन बचावकार्यकर्ते दुसऱ्या हल्ल्यात ढिगाऱ्याखाली अडकले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. लेबनॉन सैन्यानेही या दुसऱ्या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, इस्राईल च्या लष्कराकडून या घटनेवर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलम यांनी या हल्ल्यांचा निषेध करत त्यांना नवीन आणि उघड युद्धगुन्हा (a new and blatant war crime) असे संबोधले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयानेही मागील महिन्यात लेबनॉनमधील नागरिकांवर, विशेषतः आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांना संभाव्य युद्धगुन्हा म्हटले होते.

२ मार्चपासून हिझबुल्ला  या इराणसमर्थित संघटनेने इस्रायली ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर संघर्ष तीव्र झाला. त्यानंतर झालेल्या इस्रायली कारवायांमध्ये आतापर्यंत २,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचारी, २७० हून अधिक महिला आणि १७० पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे.

अमेरिकेच्या मध्यस्थीने करण्यात आलेल्या युद्धविरामानंतर हिंसाचारात काही प्रमाणात घट झाली असली, तरीही इस्राईल आणि हिझबुल्ला  यांच्यातील चकमकी दक्षिण लेबनॉनमध्ये सुरूच आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.

इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील काही भाग ताब्यात घेतले असून नागरिकांना त्या भागात परतू नये, असा इशारा दिला आहे. तरीही त्या क्षेत्राबाहेरही हवाई हल्ले सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, हिजबुल्लाहकडून इस्रायली सैन्य आणि उत्तरी इस्रायलवर ड्रोन व रॉकेट हल्ले सुरूच आहेत. तसेच इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने वापरलेल्या बोगद्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश केल्याचा दावा केला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here