प्रसारमाध्यम l प्रतिनिधी
सायबर महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आत्महत्या प्रतिबंध आणि आशा या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा विधेसेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश दिपाली डोईफोडे यांनी वरील विचार व्यक्त केले आत्महत्या ही कोणत्याही समस्यांवर उपाय नसल्याचे सांगून तो अविचारी मार्ग आहे उलट पक्षी यातून आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील समस्येत भर पडते दुर्दैवाने आजच्या काळात सर्वच वयोगटातील व विशेषता तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते की ज्यामुळे सामाजिक संतुलनावर परिणाम होतो त्यामुळे या समस्येवर सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले कार्यशाळेची सुरुवात समन्वयक डॉ दीपक भोसले यांच्या प्रास्ताविकांनी झाली त्यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील, राज्यातील व पर्यायाने देशपातळीवरची आत्महत्या करणाऱ्यांची संख्या याची आकडेवारी सादर करून या कार्यशाळेमधून काही ठोस कृतिशील उपक्रम राबवले जातील असा आशावाद व्यक्त केला याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या आत्महत्या प्रतिबंधात्मक हेल्पलाइन नंबर्सच्या माहितीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याचे संकलन डॉ दीपक भोसले यांनी केले यावेळेस ,यशवंतराव चव्हाण सेंटरचे दिपाली शेरखाने, डॉ सोनिया रजपूत डॉ टी व्ही जी सरमा मनिषा जाधव,इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मुक्ता देसाई यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुरेश आपटे यांनी केले.
दिवसभरात झालेल्या विविध सत्रांमध्ये मिरज येथील प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ सनद पवार यांनी आत्महत्येची कारणी मीमांसा,हैदराबाद येथील सामाजिक कार्यकर्त्या फराह सिद्धीकी यांनी सकारात्मक दृष्टिकोन यावर तर गोवा येथील अन्याय रहित जिंदगी या संस्थेचे डॉ रुपेश पाटकर यांनी आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाय यावर विवेचन केले समारोप सत्रात सहभागी सदस्यांनी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते उपाय असू शकतात यावर सांघिक रित्या सादरीकरण केले तर शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले कार्यशाळेसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या अध्यक्षा माननीय खासदार सुप्रियाताई सुळे,सचिव हेमंत टकले, सायबरचे अध्यक्ष डॉ आर ए शिंदे सचिव सीए ऋषिकेश शिंदे मनीषा जाधव इत्यादींचे सहकार्य लाभले कार्यशाळेत विविध भागातून सुमारे 100 हून अधिक सदस्य सहभागी झाले होते सायबर महाविद्यालयात आयोजित आत्महत्या प्रतिबंध आणि आशा या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना न्यायाधीश दिपाली डोईफोडे सोबत डॉ दीपक भोसले,डॉ सनद पवार, दिपाली शेरखाने,डॉ सोनिया रजपूत, डॉ टीव्हीजी सरमा मान्यवर उपस्थित होते.






