व्हॉट्सअ‍ॅप मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

विवाह प्रमाणपत्र आणि इतर सरकारी कागदपत्रे ; दिल्ली सरकारचा नवा उपक्रम

0
86
The Delhi government is soon launching a new initiative called "WhatsApp Governance" on a pilot basis.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सरकारी कामांसाठी अखंड रांगा, फेर्‍या आणि वेळेचा अपव्यय या सगळ्याला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. दिल्ली सरकार कडून प्रायोगिक तत्त्वावर लवकरच “व्हॉट्सअ‍ॅप गव्हर्नन्स” हा नवा उपक्रम सुरू करत आहे. यामुळे विवाह प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्ससह अनेक महत्त्वाची कागदपत्रे आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर अर्ज करून मिळणार आहेत.
कागदपत्रे आता व्हॉट्सअ‍ॅपवरच
या उपक्रमांतर्गत लोक आपल्या मोबाईल वरूनच कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतील. त्यांची पडताळणी व्हॉट्सअ‍ॅपवरच होईल आणि आवश्यक प्रमाणपत्रं डाउनलोड करण्याची सुविधा मिळेल. यामुळे सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि सोपी असणार असून, भ्रष्टाचारालाही आळा बसेल अशी अपेक्षा आहे.
सेवा अशा प्रकारे काम करेल
या प्लॅटफॉर्मवर AI-पावर्ड चॅटबॉट असणार आहे, जो हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये काम करेल. तो यूझर्सना मदत करण्याबरोबरच संपूर्ण सेवा स्वयंचलित करेल. तसेच, विविध विभागांशी संबंधित माहितीही पुरवेल. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर २५ ते ३० सेवा उपलब्ध करून दिल्या जातील आणि नंतर इतर विभागही यात सामील होतील. अधिक समन्वयासाठी हा उपक्रम दिल्लीच्या ई-जिल्हा पोर्टलशी जोडला जाणार आहे.
युजर्स कसे वापरतील ?
सध्या या प्लॅटफॉर्मवर काम सुरू असून, लाँचिंगची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सुरू झाल्यानंतर युजर्स फक्त “Hi” असा संदेश चॅटबॉटला पाठवून अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकतील. त्यानंतर चॅटबॉट युजरला एक फॉर्म देईल. फॉर्म भरल्यानंतर व आवश्यक कागदपत्रे जोडून अपलोड केल्यावर अर्ज पूर्ण होईल.

या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, वेळेची बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढेल.

————————————————————————————————————————-
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here