BCCI selection committee chairman Ajit Agarkar and T20I captain Suryakumar Yadav announced the Indian squad for the upcoming Asia Cup-2025 at a press conference held in Mumbai.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि टी – २० आय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आगामी आशिया कप-२०२५ साठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी बैठकीनंतर आगरकर आणि सूर्यकुमार यांनी भारतीय संघाची घोषणा करताना काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
कुणाला मिळाली संधी ?
भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करत आहे. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना संघात संधी मिळाली आहे. तसेच फलंदाजी व गोलंदाजीमध्ये संतुलन राखण्यासाठी हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल यांच्यावर जबाबदारी असेल.
यूएईमध्ये आयोजन
आशिया कप-२०२५ ची स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत यूएईमध्ये होणार आहे. सर्व सामने दुबई आणि अबुधाबीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडतील. २८ सप्टेंबर रोजी महाअंतिम सामना खेळवला जाणार आहे.
आठ संघ आणि दोन गट
स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांचे दोन गटांत विभाजन करण्यात आले आहे.
अ गट : भारत, पाकिस्तान, ओमान, यूएई
ब गट : बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग
प्रत्येक संघ गटातील उर्वरित ३ संघांविरुद्ध १ सामना खेळेल. त्यानंतर दोन्ही गटांतील अव्वल २ संघ सुपर ४ फेरीत प्रवेश करतील. सुपर ४ मधील अव्वल २ संघांमध्ये महाअंतिम सामना होईल.
भारतीय संघाचं वेळापत्रक
भारत विरुद्ध यूएई – १० सप्टेंबर, दुबई
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ सप्टेंबर, दुबई
भारत विरुद्ध ओमान – १९ सप्टेंबर, अबुधाबी
भारत हा आशिया कपचा गतविजेता आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारतासमोर विजेतेपद टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य समन्वय दिसत असून, चाहत्यांच्या अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत.