ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला चालना

नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

0
203
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

केंद्र सरकारने ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी झाल्याने तेथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, असे एका अलीकडील सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणात देशातील विविध राज्यांतील ५००० हून अधिक गावांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे दिसून आले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, आणि डिजिटल इंडिया मोहिम यांसारख्या योजनांमुळे ग्रामीण भागात उत्पन्नाचे स्रोत वाढले आहेत, रोजगारनिर्मिती झाली आहे आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

ग्रामीण भागात कोणता बदल : 

  • रोजगारात वाढ : मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत ग्रामीण भागात मागील दोन वर्षांत कामाच्या संधींमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • उत्पन्नात वाढ: ग्रामीण कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न मागील तीन वर्षांत २० टक्नेक्यांनी  वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • पायाभूत सुविधा: ग्राम सडक योजना अंतर्गत ८० टक्के  गावांमध्ये चांगले रस्ते झाले असून, त्यामुळे बाजारपेठांशी संपर्क सुकर झाला आहे.
  • डिजिटल प्रगती: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे ६५ टक्के गावांमध्ये इंटरनेट सुविधा पोहोचली असून, याचा वापर शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्रात अधिक होत आहे.
  • स्वच्छ पाणी आणि आरोग्य: जल जीवन मिशन अंतर्गत लाखो कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे.

शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदान, ई-नाम पोर्टलद्वारे थेट बाजारात विक्रीची संधी आणि शेतीपूरक व्यवसायांवर दिल्या गेलेल्या प्रोत्साहनामुळे शेतीव्यवस्था बळकट झाली आहे. तसेच, महिलांसाठी स्वयं-सहायता गट आणि डिजिटल व्यवहारांना चालना देणाऱ्या योजनांमुळे आर्थिक स्वावलंबनात वाढ झाली आहे.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here