spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeशासकीय योजनापीएफ काढणे आता झाले सोपे

पीएफ काढणे आता झाले सोपे

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने [ईपीएफओने]  पीएफ खात्यातून पैसे काढण्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे पीएफ काढणे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे आणि डिजिटल झाले आहे.  पीएफ अकाउंटमधून पैसे काढायचे असतील तर खालील ५ नियमांबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

UAN आणि मोबाईल नंबर सक्रिय असला पाहिजे
सर्वात आधी तुमचा UAN सक्रिय आहे की नाही याची खात्री करा. यासोबतच UAN सक्रिय करताना तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर देखील सक्रिय आणि तुमच्यासोबत असावा कारण पीएफ काढताना त्याच क्रमांकावर OTP येईल, जो तुमची ओळख पटवेल.

आधार क्रमांक EPFO शी लिंक
तुमचा आधार क्रमांक EPFO सिस्टमशी लिंक केला असावा. तुम्ही ऑनलाइन PF पैसे काढण्याचा दावा करता तेव्हा ओळखीची पुष्टी करण्यासाठी आधार वरून OTP द्वारे ई-केवायसी केले जाते. तुमचा आधार लिंक केलेला नसेल तर, ऑनलाइन क्लेम प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

पीएफचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. अशा परिस्थितीत, तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड EPFO डेटाबेसमध्ये योग्यरित्या प्रविष्ट करणे महत्वाचे आहे.

पॅन कार्ड EPFO रेकॉर्डमध्ये
तुम्ही ५ वर्षांपेक्षा कमी काळ काम केले असेल आणि तुम्हाला पीएफचा अंतिम सेटलमेंट करायचा असेल तर, तुमचा पॅन क्रमांक EPFO रेकॉर्डमध्ये नोंदवलेला असला पाहिजे नाहीतर, तुमचा टीडीएस कापला जाऊ शकतो.

जॉइनिंगची तारीख EPFO रेकॉर्डमध्ये असावी
तुम्ही नोकरी कधी सुरू केली म्हणजे जॉइनिंग तारीख EPFO रेकॉर्डमध्ये असणे आवश्यक आहे. ही माहिती उपलब्ध नसेल तर, तुमची पीएफ क्लेम प्रक्रिया अडकू शकते.

ईपीएफओ अकाउंटमधील पैसे तुमच्या भविष्यासाठी जमा करून साठवले जातात. पण काही गरज पडल्यास विड्रॉल करता येतात. पीएफचा काही भाग खाली दिलेल्या महत्त्वाच्या कारणांसाठी काढता येतो:

  • घर खरेदी करणे किंवा बांधणे
  • कारखाना बंद पडल्यास किंवा लॉकआउट झाल्यास
  • स्वतः किंवा कुटुंबातील सदस्याच्या गंभीर आजारासाठी
  • स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी
  • मुलांच्या शिक्षणासाठी (मॅट्रिक नंतर)
  • सर्गिक आपत्तीच्या बाबतीत
  • वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या समस्यांमुळे
  • अपंग व्यक्तीसाठी उपकरणे खरेदी करणे
  • ५४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक निवृत्तीपूर्वीही अंशतः पैसे काढू शकतात

ऑनलाईन PF क्लेम कसा करायचा
UAN आणि पासवर्ड प्रविष्ट करून EPFO वेबसाइटवर लॉग इन करा.
KYC आणि सेवा संबंधित माहिती योग्यरित्या अपडेट करा.
गरजेनुसार आंशिक (फॉर्म ३१) किंवा पूर्ण पैसे काढण्यासाठी (फॉर्म१९) अर्ज भरा
नोंदणीकृत मोबाईलवर OTP मिळाल्यानंतर एंटर करा आणि क्लेम प्रक्रिया पूर्ण करा.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments