मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांसाठी अखंडित व दर्जेदार बससेवा सुनिश्चित करण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आवश्यक चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर ( कंत्राटी पद्धतीने ) तीन वर्षांसाठी भरती करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया राज्यातील सहा प्रादेशिक विभाग निहाय लागू होईल.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ” बससेवेची वाढती मागणी लक्षात घेता, योग्य मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल.”
थोडक्यात
-
भरती प्रकार : कंत्राटी (३ वर्षांसाठी)
-
निविदा प्रक्रिया : ई-निविदा पद्धतीने, सहा प्रादेशिक विभाग निहाय
-
उपलब्ध वेतन : अंदाजे ₹ ३०,००० /- प्रति महिना
-
प्रशिक्षण : उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण मिळणार
-
लक्ष्य : वाढती बससेवा व प्रवाशांसाठी अखंडित सेवा
राज्य सरकारच्या निर्णयाचा व्यापक परिणाम
-
काही दिवसांपूर्वी राज्य पोलीस दलातील रिक्त पदांसाठी भरती मंजूर झाली.
-
लांबलेली भरती प्रक्रिया आता गतीमान होणार, ज्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.