उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

सत्तासंलग्न चर्चांना उधाण

0
143
Shiv Sena Thackeray faction chief Uddhav Thackeray has arrived to meet Chief Minister Devendra Fadnavis.
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज थेट भेट होणार असून, ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात होणार आहे. उद्धव ठाकरे राम शिंदे यांच्या कार्यालयात पोहोचले असून, या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक संवादात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. “तुमच्यासाठी इकडे येण्याचा स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता,” असं फडणवीस यांनी स्पष्टपणे सुचवले होते. त्यानंतर अवघ्या २४ तासांतच उद्धव ठाकरे – फडणवीस भेट होत असल्यामुळे या घडामोडीचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.
याबाबत अधिकृतपणे कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नसल्यामुळे ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होणार आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका व अन्य महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, 5 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या “विजयी मेळाव्या”मध्ये उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर दिसून आले होते. त्या भेटीनंतर दोन्ही ठाकरे बंधू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी अद्याप या संभाव्य युतीबाबत कोणताही स्पष्ट निर्णय घेतलेला नाही.
दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आता भाजपशी संवाद वाढवत असल्याचं चित्र समोर येत असल्यामुळे, राज्यातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत. सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असताना, ही भेट भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते. राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना, उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची भेट कोणत्या वळणावर जाते, हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे.

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here