कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
- त्यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. त्या शाळेत वर्गप्रतिनिधी होत्या. त्यांनी वर्गातील सर्व मित्र-मात्रीनिकडून पैसे गोळा करून त्या पैशाची स्टेशनरी खरेदी केली. स्टेशनरीचे साहित्य अनाथালयाच्या मुलांना दिले. या कामातून त्यांना खूप काही समजले. समाजिक कार्य करत त्या ‘गुल्लकारी’द्वारे उद्योजिका बनल्या सुष्मिता कणेरी असे त्यांचे नाव आहे. सुष्मिता पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनियर होत्या. पण आता त्या उद्योजिका बनल्या आहेत. सुष्मिता या पुणे शहरात एका सामान्य घरात वाढल्या. त्यांचे आई-वडील नेहमी कष्टाने जगायला आणि आत्मनिर्भर राहायला सांगायचे. सुष्मिता यांनी २०२० सॉफ्टवेअर इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्याना नोकरी करायची होती. पण, शाळेत असल्यापासूनच तिला सामाजिक उद्योजक बनायचं होतं.
सुष्मिता सांगतात, “मी शाळेत असताना क्लास मॉनिटर होते. एकदा मी वर्गणी गोळा करायची मोहीम चालवली. माझ्या मित्रांकडून पैसे जमा करून ते एका अनाथालयाला दान करायचं ठरवलं. आम्ही पाचशे रुपये जमा केले आणि अनाथালयाच्या मुलांसाठी स्टेशनरी खरेदी केली. या छोट्याशा कामातून मला समजलं की, खूप सारे लोक अडचणींचा सामना करत आहेत. तेव्हापासून मला समाजासाठी काहीतरी करायची आणि एनजीओ सोबत काम करायची आवड निर्माण झाली.”
२०२१ मध्ये सुष्मिता यांनी नोकरी करण्याऐवजी ‘गुल्लक’ नावाचं क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म सुरू केलं. क्राउडफंडिंग म्हणजे काय, तर अनेक लोकांकडून थोडं-थोडं धन जमा करून एखाद्या चांगल्या कामासाठी मदत करणे. ‘गुल्लक’चा उद्देश दान केलेल्या पैशांचा हिशोब ठेवणं आणि त्या दानाचा काय परिणाम होतोय, हे पाहणं हा होता. या उपक्रमामुळे लोकांना दान करण्याची संधी मिळाली, पण फक्त दान करून उपयोग नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं.सुष्मिता म्हणतात, “मला असं वाटलं की, फक्त पैसे दान करून काही होणार नाही. आपल्याला असे मार्ग शोधायला हवेत, ज्यामुळे लोक आत्मनिर्भर बनतील आणि त्यांच्या आयुष्यभर कमाई करू शकतील.”
२०२१ मध्ये सुष्मिताच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. त्या तेलंगणाला गेल्या आणि तिथे निर्मल कलेच्या कलाकारांना भेटल्या. ही कला लाकडावर केली जाते. लाकडावर रंग भरून चित्र काढले जातात आणि त्यातून कथा सांगितल्या जातात. सुष्मिता सांगते, “मी पाहिलं की, हे कलाकार अनेक पिढ्यांपासून ही कला करत आहेत. पण त्यांच्या कलेला कुणीही पसंत करत नव्हतं.”
“ते कलाकार खूप निराश झाले होते. त्यांच्या मेहनतीला कुणी किंमत देत नाही आणि त्यांना योग्य दाम मिळत नाही, असं त्यांना वाटत होतं. मी एका कलाकाराला विचारलं की, तुम्ही तुमच्या मुलाला ही कला शिकवणार का? तर ते रागावले. ते म्हणाले, ‘मी माझ्या मुलाला सांगेन की, तू नोकरी शोध.’ त्या क्षणी मला जाणवलं की, आपण या पारंपरिक कलांना वाचवलं पाहिजे आणि कलाकारांना कायमस्वरूपी कमाई करण्याची संधी दिली पाहिजे.”
अशी झाली सुरुवात:
निर्मल कलेच्या कलाकारांची दुःखं बघून सुष्मिता खूप दुःखी झाल्या. त्यांनी एक वर्ष आणखी फिरून देशभरातील इतर कलाकारांशी भेट घेतली. त्यानंतर तिने एप्रिल २०२३ मध्ये “गुल्लकारी”ची (Gullakari) सुरुवात केली. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जे कलाकारांना थेट ग्राहकांशी जोडतं. ‘गुल्लकारी’ चा उद्देश पारंपारिक कलेला सन्मान आणि ओळख निर्माण करुन देणे आहे.
‘गुल्लकारी’ काय करतं?
‘गुल्लकारी’ हे लोप होत चाललेल्या कला प्रकारांबद्दल जागरूकता निर्माण करतं. कलाकार आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क घडवून आणतं. पारंपरिक कला जिवंत ठेवण्याचा आणि कलाकारांना मदत करण्याचा हा एक प्रयत्न आहे.’गुल्लकारी’ पर्यावरणपूरक वस्तू वापरतं. नाजूक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बबल रॅपऐवजी धान्याच्या भुशासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. ‘गुल्लकारी’ लवकरच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे एक डिजिटल रेकॉर्ड जिथे कोणतीही माहिती सुरक्षितपणे साठवली जाते. त्यामुळे ग्राहकांना खात्री पटेल की, ते जे उत्पादन घेत आहेत, ते खरंच अस्सल आहे.
राज्य आणि कला
‘गुल्लकारी’ सध्या १३ लोप होत चाललेल्या कलांना वाचवण्याचं काम करत आहे. त्या प्रत्येक कलेचा स्वतःचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्या कलांमध्ये महाराष्ट्रातील वारली पेंटिंग, बंगाल आणि ओडिशाची पटचित्र, मध्य प्रदेशची गोंड पेंटिंग , कर्नाटकाची चित्तारा कला , तेलंगणाचे नाइकपॉड मास्क आणि आंध्र प्रदेशचा थोलू बोम्मलाटा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ते तेलंगणाची निर्मल आणि चेरियल पेंटिंग, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची कलमकारी , बंगालच्या हाताने बनवलेल्या मूर्ती, राजस्थानची मिनिएचर पेंटिंग , राजस्थानचे कवाड कथा सांगणारे बॉक्स आणि बंगालची मदुरकथी या कलांवरही लक्ष केंद्रित करतात.
उलाढाल
२०२४ मध्ये ‘गुल्लकारी’ने ४ हजारपेक्षा जास्त हस्तकला वस्तू विकल्या. फक्त दोन वर्षांत त्यांचं उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचलं. सुष्मिता सांगतात, “आम्ही १५ कॉर्पोरेट कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. आम्ही त्यांना फक्त उत्पादनं विकत नाही, तर कार्यशाळाही घेतो. या कार्यशाळांमध्ये कलाकार त्यांच्या कलेबद्दल माहिती देतात आणि यासाठी त्यांना कोणतीही फी लागत नाही.”






