शुद्ध सांडपाणी शेतीसाठी देण्याची मागणी; ४०० एकर क्षेत्राला होणार लाभ!

0
69
Google search engine

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार होणारे शुद्ध पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल महाडिक यांच्यावतीने निवेदनाद्वारेकरण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील शिरोली विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था आणि पंचगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने महापालिकेकडे ही मागणी केली आहे.

शिरोली पुलालगतच्या ४०० एकरांहून अधिक शेतीला या पाण्याचा लाभ होऊ शकतो. प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडू शकते. याबाबत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड आणि महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here