कसबा बावड्यात अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिटचे लोकार्पण!

0
7
Google search engine

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिटचे लोकार्पण शनिवारी (३१ ऑक्टोबर) उत्साहात पार पडले. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या युनिटचे उद्घाटन करण्यात आले.

या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ५० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, सीटी स्कॅन, एमआरआय, कॅथलॅब, IPHL लॅब आणि CCB यांसारख्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमुळे कोल्हापूरसह परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे. तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here