कोल्हापूर : कणेरीवाडी (ता. करवीर) येथे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापूर (दक्षिण) विधानसभा मतदारसंघामधील ठरावधाकरांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासमवेत उपस्थित राहीले.
गोकुळ दूध संघाची निवडणूक ही साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची आणि न्यायाची लढाई आहे. मल्टीस्टेटच्या लढ्यात आपण ताकदीने उतरलो म्हणूनच आज ठरावधारकांना मताचा अधिकार मिळाला आहे. आता ही लढाई गोकुळ वाचवण्यासाठी असून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे रहा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ मल्टी स्टेट करायला विरोध केला म्हणूनच आज दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघ सुरक्षित राहिला आहे. आता इथेच थांबून चालणार नाही, भविष्यातही गोकुळ दूध संघ मजबूत ठेवायचा आणि टिकवायचा असेल तर आमदार सतेज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी बोलताना केले.
यावेळी भाई पोपटराव बोऱ्हाडे, जि. प. गटनेते एकनाथ पाटील, जि. प. सदस्य संग्राम पाटील, सुदर्शन खोत, एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, श्रीपती पाटील, सुभाष वाडकर, विश्वास दिंडोर्ले, विलास साठे, आनंदा बनकर, सागर पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, माजी संचालक प्रकाश पाटील, रामराजे कुपेकर, बाजार समितीचे सदस्य सुयोग वाडकर, संदीप पाटील, अनिल म्हेत्रे, शोभा राजमाने, मीनाक्षी पाटील, अनिता कांबळे यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार, शेतकरी, दूधउत्पादक आणि ठरावधारक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…






