शाहूवाडी-पन्हाळ्यातील २५३ दूध संस्था ठरावधारकांचा राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा…

0
53
Google search engine

सरूड : शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या ठरावधारकांचा राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने भव्य मेळावा सरूड येथे झाला. माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील २५३ दूध संस्था ठरावधारकांनी आघाडीला पाठिंबा व्यक्त केला. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांशी संबंधित ही निवडणूक असून, त्यांच्या हितासाठी आपण ठामपणे भूमिका मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मेळाव्यास विविध दूध संस्थांचे सभासद, ठरावधारक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहूवाडी-पन्हाळ्यातील ठरावधारकांचा हा मेळावा आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here