जयसिंगपूर : माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर यांच्या वतीने नागरिकांसाठी सलग तीन दिवस विविध आजारांवरील निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा शुभारंभ २९ सप्टेंबर रोजी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल महाडिक तसेच संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या उपस्थितीत झाला.
२९ सप्टेंबरला कार्डिओलॉजी व मेडिसिन कॅम्पमध्ये हृदयविकार, मधुमेह व पक्षाघाताची तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला देण्यात येत आहे. ECG, रक्त तपासणी, X-Ray, Echocardiography आणि TMT या तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.
३० सप्टेंबरला मणके व हाडांच्या विकारांसाठी विशेष शिबिर होणार असून, मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे विकार, हात-पायातील मुंग्या आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी केली जाणार आहे. फिजिओथेरपीवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
१ ऑक्टोबरला कान-नाक-घसा व मूत्रविकार तपासणी शिबिर होणार आहे. सायनस, टॉन्सिल, कानाचे विकार, मूतखडा, प्रोस्टेट तसेच लघवीसंबंधी आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. निदान झालेल्या पात्र रुग्णांना योजनेनुसार मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अभिजित माने, डॉ. नीता माने आणि डॉ. राजवर्धन पाटील यांनी केले आहे. शिबिराचे ठिकाण माने केअर हॉस्पिटल, झुडिओ शेजारी, सांगली-कोल्हापूर रोड, जयसिंगपूर असून अधिक माहितीसाठी ७५०७२ २६६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.






