गोकुळ निवडणुकीसाठी विश्वासराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

0
66
Google search engine

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी विश्वासराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकाराच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करताना गोकुळ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आपले अतूट नाते निर्माण झाले आहे. दूध उत्पादकांच्या कष्टाची, त्यांच्या घामाची आणि अपेक्षांची जाणीव ठेवून गोकुळच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय दौरे करताना दूध उत्पादकांकडून गेल्या अनेक वर्षांतील कामाची आठवण आणि कौतुक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पदापेक्षा माणसांचा विश्वास मोठा असून, हाच विश्वास आपली खरी ताकद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेले काम अधिक ताकदीने पुढे नेण्याचा संकल्प उमेदवारी अर्ज दाखल करताना केला असल्याचे पाटील यांनी सांगितले. गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकाचा विश्वास, त्यांच्या कष्टाचा सन्मान आणि त्यांच्या भविष्याचा विचार केंद्रस्थानी ठेवून पुढील वाटचाल करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“दूध उत्पादकांचा विश्वास हीच आमची खरी कमाई असून, त्यांचे हित हेच आमचे ध्येय आहे,” असे विश्वासराव पाटील यांनी सांगितले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here