गोकुळची स्वायत्तता आणि सहकार टिकवण्यासाठी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ द्या : आ.सतेज पाटील

0
16
Google search engine

शिरोळ : गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज शिरोळ तालुका आणि जयसिंगपूर परिसरातील ठरावधारकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी राखून गोकुळ दूध संघाची स्वायत्तता आणि सहकार टिकवणे आणि यातूनच गोकूळ दूधसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याची आमची भुमिका आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी गेल्या ५ वर्षांत घेतलेल्या निर्णयांना पुढे नेत गोकुळ संघाचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमच्या संकल्पाला साथ द्या असे आवाहन यावेळी ठराव धारकांना केले. यादरम्यान माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांची भेट घेतली.

या प्रचार दौऱ्यामध्ये माजी आमदार राजू बाबा आवळे, दत्त समूहाचे गणपतराव पाटील, गोकुळचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील-मुरगुडकर, भवानी सिंह घोरपडे, मधुकर पाटील,चेअरमन रघुनाथ पाटील, दरगू गावडे,पृथ्वीराज यादव, शेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, सुदर्शन कदम, नितीन बागे , जयदीप थोरात, काँ. आप्पा पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रदीप चव्हाण, राजू आवळे, प्रमोद पाटील, अमर यादव, विजय सूर्यवंशी, सुदर्शन कदम, सर्जेराव पवार, गुंडाप्पा पवार, धनाजी पाटील,शक्ती पाटील, ओमकार मुडशी यांच्यासह समविचारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here