कोल्हापूर : समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावण व्रतवैकल्य’ या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत महावीर गार्डनजवळील नष्टे लॉन येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कार्यक्रमात पंचगंगा नदीतून आणलेल्या जलाने महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक, गोमाता पूजन, ध्वजवंदन, शस्त्रपूजन आणि महायज्ञ होणार आहे. यानंतर विविध जाती-पंथातील १०८ दाम्पत्य मंत्रघोषात सात्त्विक भोजन करून सामुदायिकरीत्या उपवास सोडणार आहेत. तसेच इस्कॉनच्या भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






