डॉ. हेमांगी वलके (MBBS, MD), कोल्हापूर यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

0
42

प्रसारमाध्यम l प्रतिनिधी 

 

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची निष्ठा लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

डॉ. हेमांगी वाळके यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.व निवड केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र विभाग व राष्ट्रीय सचिव डॉ नरेंद्र उंदिरवाडे सर यांचे आभार मानले.

त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here