Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

पाटना : देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त होत असून बिहारमध्ये सत्तांतराची चर्चा रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

त्याचवेळी नितीश कुमार यांचे पुत्र नितीश कुमार यांची सक्रिय राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांची बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यसभेच्या जागांवर गणित

बिहारमधील राज्यसभेच्या आठ जागांपैकी एनडीएला सहा ते आठ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापैकी दोन जागा जनता दल युनाइटेड ला मिळू शकतात. त्या दोन जागांपैकी एका जागेवर नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या नामांकनाची अंतिम तारीख ५ मार्च असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपकडे मुख्यमंत्रिपद?

जर नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणात गेले, तर बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भारतीय जनता पार्टी दावा करू शकते. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे आणि उपमुख्यमंत्रीपद निशांत कुमारांकडे जाण्याची शक्यता चर्चेत आहे.

जाहीर उमेदवार

भाजपने राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि प्रदेश सरचिटणीस शिवेश कुमार यांना संधी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांची उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात आहे.

जनता दल युनाइटेड ला दोन जागा, तर राष्ट्रीय लोक मोर्चा चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांना एक जागा देण्यात आल्याची माहिती आहे.

बिहार विधानसभा पक्षनिहाय जागा

एनडीए – 202

  • भारतीय जनता पार्टी – 89

  • जनता दल युनाइटेड – 85

  • लोक जनशक्ती पार्टी – 19
  • हिंदुस्थानी अवाम मोर्चा– 5
  • राष्ट्रीय लोक मोर्चा– 4

महागठबंधन – 35

  • राष्ट्रीय जनता दल – 25
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 6
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी-लेनिनवादी – 2
  • भारतीय सर्वसमावेशक पक्ष – 1

  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) – 1

इतर

  • ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – 5
  • बहुजन समाज पक्ष – 1
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here