राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्हा रेशीम कार्यालयाकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेशीम शेती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी उत्पन्न ते विक्रीपर्यंत सर्व व्यवहार जिल्ह्यामध्येच व्हावे यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्या अनुषंगाने करवीर तालुक्यातील बेले इथले प्रगतशील शेतकरी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये श्री महालक्ष्मी रेशीम चॉकी कीटक संगोपन केंद्र उभारण्यात आलं आहे.
या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात रेशीम शेतीमध्ये सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेशीम शेतीतून उत्पन्नचा नवा मार्ग मिळतोय. रेशीम शेती म्हणजे गावच्या आर्थिक विकासाची पायाभरणी आहे. रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा खात्रीशीर नवा मार्ग आहे.जिल्ह्यामध्ये आठशे ते नऊशे एक्कर क्षेत्रात रेशीम शेती केली जाते.या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक प्रगती पाहता जिल्ह्यामध्ये तीन हजार एक्करमध्ये रेशीम शेती करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
शेतकरी तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर चॉकी,रेशीम आळी देणारं, रेशीम शेतीच सर्व प्रकारचं मार्केट उपलब्ध असल्यानं,शेतकऱ्यांचा रेशीम शेतीला प्रतिसाद वाढल्याचं सांगितलं.रेशीम अधिकारी डॉ बी एम खंडागरे यांनी बेले इथं जिल्ह्यातल पहिलं रेशीम चॉकी कीटक संगोपनचं केंद्र निर्माण झाल्यानं रेशीम शेतकऱ्यांची मोठी गरज पूर्ण झाल्याचं सांगितलं,यावेळी प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी,एम बी पाटील,अभिजित घाडगे,सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार स्वप्नील गावडे,गटविकासअधिकारी डॉ संदीप भंडारी, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे ,तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील ,सरपंच अर्चना लांबोरे, उपसरपंच बाजीराव लांबोरे, माजी उपसरपंच अश्विनी पाटील, हिंदुराव पाटील, तेजस पाटील,दीपक शेट्टी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.



