कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याना १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार होता. मात्र याबाबत शासनाकडून निश्चित केव्हापासून या आयोगाची अमलबजावणी होणार हे जाहीर करण्यात आले नाही. आठव्या वेतन आयोगात किती लाभ होणार आणि कसा लाभ होणार या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे. आता नव्या माहिती नुसार आठव्या वेतन आयोगातील काही भत्ते बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सातव्या आयोगात ज्याप्रमाणे केले होते तसेच काहीसे केले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि सुविधांवर परिणाम होणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे थेट नुकसान होऊ नये यासाठी बेसिक वेतन वा अन्य सुविधेत वाढ होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
सरकारने सातव्या वेतन आयोगात अनेक छोटे – मोठे भत्ते हटवले होते. आणि त्यांच्या जागी मोठ्या वर्गवारीतील भत्त्यांचा समावेश केला होता. यामुळे भत्त्यांची संख्या कमी झाली असली तर पे सिस्टीमला सोपे आणि पारदर्शक बनवले जाऊ शकेल. आता बहुप्रतिक्षित आठव्या वेतन आयोगाबाबत देखील अशाच प्रकारची पावले सरकारकडून उचलली जाऊ शकतात. आता आठव्या वेतन आयोगात अशाच प्रकारची पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की जर काही भत्ते हटवले जात असले तरी कर्मचाऱ्यांचे थेट नुकसान होऊ नये यासाठी बेसिक वेतन वा अन्य सुविधेत वाढ होऊ शकते असे म्हटले जाते. सरकारने सध्या अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतू कर्मचाऱ्यांच्या आणि पेशनर्सना या संदर्भात मोठी उत्सुकता आहे.
मीडिया रिपोर्टच्या मते, ट्रॅव्हल अलाऊन्स, स्पेशल ड्यूटी अलाऊन्स, छोट्या स्तरावरील रिजनल भत्ते आणि काही विभागीय अलाऊन्सना संपवले जाऊ शकते. वास्तविक, असा अंदाज लावला जात आहे की शेवटच्या काही विभागीय अलाऊन्सला समाप्त केले जाऊ शकतो. असे असले तरी या संदर्भात सरकारकडून काही अधिकृतपणे माहिती पुढे आलेली नाही.