कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
खर तर चहा हे भारतीय पेय नाही. मात्र आता चहा भारतीयांच्या आवडीचे आणि आवश्यक झाला आहे. आम्ही लहानपणी चहा फक्त सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा घेत होतो. त्यावेळी चहाच्या टपऱ्या अगदी मर्यादित होत्या. आता चहाच्या टपऱ्या जागोजागी झाल्या असून चहाही दिवसरात्र केव्हाही पिला जातो. चहा पिला की कंटाळा जातो. झोप जाते. तरतरीतपणा येतो. हुशारी येते. तर असं आहे कि, चहा पिण्याआधी पाणी प्यायचे बर का! चहा पिण्यापुर्वी पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.
काही लोकांना चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो. अशा वेळी चहानंतर होणारी ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? याबद्दल तज्ज्ञांची मते पाहू. आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिण्याचा पचनसंस्था, ॲसिडिटी आणि चयापचयावर वाईट परिणाम होतो. कारण चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन हे घटक असतात, जे ॲसिडिटी वाढवतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल, तर त्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, चहा गरम असल्यास ॲसिड पातळी वाढते, पण पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड पातळी वाढत नाही.
चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावे कारण, त्यामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि चहातील कॅफिनमुळे होणारे दुष्परिणाम कमी होतात. चहामुळे पोटात ॲसिड तयार होते, पण पाणी प्यायल्याने पोटात एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि अल्सरसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, पाणी प्यायल्याने तोंडातील आणि आतड्यांमधील बॅक्टेरिया देखील स्वच्छ होतात.
प्रसिद्ध डॉक्टर सुभाष गिरी सांगतात की, रिकाम्या पोटी चहा पिण्यापूर्वी एक ग्लास साधे पाणी प्यायल्यास पाणी शरीरातील ॲसिड पातळ करू शकते. असे केल्याने चहातील कॅफिनचा परिणाम कमी होतो. त्यामुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते. मात्र, पाणी प्यायल्याने ॲसिडिटी पूर्णपणे दूर होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. परंतु रिकाम्या पोटी चहामुळे होणारी ॲसिडिटी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.
मोकळ्या पोटी चहापूर्वी काय खावे किंवा प्यावे :
–गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट्सच्या मते, ज्या लोकांना चहामुळे ॲसिडिटी होते, त्यांनी रिकाम्या पोटी सर्वप्रथम पाणी प्यावे.
-हवे तर कोमट पाणी प्यावे. यामुळे पोटाचे पीएच पातळी संतुलित राहते.
-रिकाम्या पोटी चहा पिण्यापूर्वी हलका नाश्ता किंवा एखादे फळ खाऊ शकता. शक्यतो नाश्त्यानंतरच चहा प्यावा.
-ज्यांना ॲसिडिटीचा सर्वाधिक त्रास होतो, त्यांनी दूधाच्या चहाऐवजी हर्बल टी, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्यावी.
-शिवाय, शक्य असल्यास दूधाचा चहा दूधासोबत उकळू नये, तर ब्लॅक टी बनवून त्यात वरून गरम दूध मिसळून प्यावा.
————————————————————————————————-






