spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeमाहिती तंत्रज्ञानव्हॉट्सअ‍ॅप स्टेटस होणार अधिक धमाल

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस होणार अधिक धमाल

लेआउट, फोटो स्टिकर आणि म्युझिक स्टिकर फीचर्स लाँच

कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जगभरातील कोट्यवधी लोक दररोज वापरत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी आणखी आकर्षक फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत. मेटाच्या या नव्या अपडेटमुळे स्टेटस टाकणे आता अधिक क्रिएटिव्ह, मजेदार आणि वैयक्तिक होणार आहे.
नवीन लेआउट फीचर
आता कोलाज तयार करण्यासाठी वेगळ्या अ‍ॅपची गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या लेआउट फीचरद्वारे युजर्स सहजपणे एकापेक्षा अधिक फोटो निवडून सुंदर कोलाज बनवू शकतात. तुमचा आवडता लेआउट निवडा आणि इंस्टाग्राम स्टोरी स्टाईलमध्ये थेट स्टेटसवर शेअर करा.
फोटो स्टिकर फीचर
हे फीचर इंस्टाग्रामच्या कस्टम स्टिकरसारखे असून, युजर्सना त्यांचा फोटो स्टिकरमध्ये रूपांतरित करण्याची सुविधा देते. फोटोचा आकार बदलणे, क्रॉप करणे आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये एडिट करून थेट स्टेटसवर पोस्ट करणे आता शक्य आहे.
म्युझिक स्टिकर फीचर
इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर आधीच म्युझिक स्टेटसची सुविधा होती. आता त्यात आणखी भर घालत कंपनीने म्युझिक स्टिकर फीचर आणले आहे. यामुळे फोटो किंवा व्हिडिओमध्ये म्युझिक स्टिकर लावून स्टेटस अधिक आकर्षक बनवता येईल.

या अपडेटमुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फक्त एक अपडेट न राहता, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आणि क्रिएटिव्हिटीची ओळख ठरणार आहे.

————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments