प्रसारमाध्यम डेस्क :
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो आणि हा वाढलेला वातदोषाच पित्त आणि कफ दोषांना दुषीत करून आजाराची निर्मिती करत असतो त्यामुळे पावसाळा सुरू झाला की आजार निर्माण होतात. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी राहाणीमानात आवश्यक बदल करावे लागतात. तसंच या काळात पचनशक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी झाल्याने आजार वाढतात. यामुळेच आपण सर्वांनी खाण्यापिण्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.
पावसाळ्यात पचनक्रिया मंद असल्याने अन्नपचन योग्य होत नाही यासाठी पचायला हलका, आणि ताजा गरम आहार घ्यावा. उकडलेले, उकळलेले आणि भाजलेले अन्न खावे. कच्चे, तळलेले आणि आंबवलेले पदार्थ टाळावेत.
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. या ऋतूमध्ये शिंका येणे, खोकला, जुलाब आणि पोटात संसर्गाची प्रकरणे सर्वाधिक आढळतात. काहींना तापही येतो. हे टाळण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घ्यावा. अधिकाधिक पाणी प्यावे आणि स्वतःला हायड्रेट ठेवावे. यासाठी आवळा, लिंबूपाणी, नारळपाणी आणि कोरफडीचा रस घ्यावा.
पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी ती कोमट पाण्यात मीठ घालून स्वच्छ करा. तीन तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाऊ नये. केळी, पपई, ताजा रस यांचे सेवन येईल. रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि पॅकबंद वस्तू खाणे टाळा, तसेच हात वारंवार चांगले धुवा.
जड जेवण टाळावे. हल्के, ताजे आणि पचनास योग्य असाच आहार घ्यावा.
सकाळी ग्लासभर कोमट पाणी लिंबू पिळून प्यावं.
न्याहारीमध्ये तृणधान्ये, डाळ, दही, मुगाच्या डाळीचे थालीपीठ किंवा फ्रूट चाट यांचा समावेश करू शकता. नाश्त्यात तेलकट खाणे टाळावे.
दुपारच्या जेवणात चपाती,तूप, भाज्या, दही, कोशिंबीर घ्या. फायबर, प्रथिने, पोषक तत्वे, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.लसूण चटणीचा समावेश असावा.ताकात सुंठ, जिरं, चिमूटभर मिरी घालून दुपारी प्यावं.
शक्यतो रात्रीच जेवण लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभपणे होते.
रात्रीच्या जेवणात नेहमी हलक्या आणि सहज पचणाऱ्या गोष्टी खाव्यात. रात्रीच्या जेवणात तुम्ही खिचडी, डाळ आणि दही खाऊ शकता.
फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी, कोमट पाण्यात मीठ घालून स्वच्छ करा. तीन तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाऊ नये.
ज्वारी, जव , नाचणी, गहू इ. धान्यांची भाकरी किंवा चपाती तुपाबरोबर घ्यावी.
दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, कोहळा अशा वेलभाज्यांचा आहारात समावेश असावा.चणा, वाटाणा, हरभरा, पावटा, राजमा इ. कडधान्यांचा वापर करू नये. मूग तसंच कमी प्रमाणात मटकी, मसूर, कुळीथ इ. कडधान्ये शरीरातील वात न वाढवता सहज पचतात
आल्याचा छोटा तुकडा तव्यावर भाजून थंड करा. आता या तुकड्यात थोडेसे सैंधव मीठ घाला आणि जेवणाच्या पाच मिनिटे आधी खा. त्यामुळे भूक वाढते आणि पचनक्रिया बरोबर राहते.
थंड पाणी पिऊ नये. दिवसभर उकळवून गार झालेलं किंवा कोमटच पाणी प्यावं. तसंच तुळशीपत्र टाकलेलं आणि तुरटी फिरवलेलं पाणी प्यावं.
हिरव्या पालेभाज्या: श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास वात होण्याचा त्रास वाढतो. एवढेच नाही तर या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि कीटक देखील वाढतात, ज्यामुळे पोटदुखी आणि इतर तक्रारी होऊ शकतात त्यामुळे त्या जास्त खाऊच नयेत.तसेच वांगी ही वात वाढवतात त्यामुळे खाऊ नयेत.
पावसाळ्यामध्ये माशांच्या प्रजननाची वेळ असते. म्हणून, यावेळी संसर्गाचा धोका अधिक असतो, म्हणूनच त्यांना खाणे टाळले पाहिजे.
दूध – दहीः पचनाची तक्रार असलेल्या मंडळी नी या हंगामात दूध ,दहीचेसेवन करणे देखील टाळले पाहिजे कारण सर्दी, खोकला आणि घशासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.
दूध पिण्यामुळे गॅस आणि पोटाच्या आजाराची शक्यता जास्त होऊ शकते.