
कोडोली प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
आज राज्यभरातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. पन्हाळा तालुक्यातील शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांना फेटे बांधून औक्षण, पुष्पवृष्टी तसेच साखर पेढे भरवत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.
उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमातून पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील हॉवर्ड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत फेटे घालून तसेच लेझीम, हलगीच्या साथीने स्वागत करण्यात आले. या शाळेमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने पहिल्या दिवशी देखील आपल्या हटके स्टाईलने शाळेने सर्व पालक आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच स्नेहभोजनाची सोय करण्यात आली होती.
यावेळी कोडोली ग्रामपंचायतचे उपसरपंच डॉ. प्रशांत जमने, मुख्याध्यापक सचिन बिडकर,अशोक महापुरे, अनंत चोपडे, सालोमन गायकवाड, जॉन जगताप, अब्राहाम काळे,अमोल चोपडे, अविनाश महापुरे यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
—————————————————————————————————–





