प्रसारमाध्यम डेस्क,
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरावरील काळभैरव मंदिरात आज काळभैरव जन्मकाळ सोहळा चांगभलं च्या जयघोषात मोठया धार्मिक उत्साहात पार पडला. काळभैरवाची पारंपारीक भैरवं रूपात पूजा तर जोतिबाची चतूर्भूज रूपातपूजा बांधण्यात आली होती.
आज काळभैरव जन्मकाळ सोहळा चांगभलं च्या जयघोषात मोठया धार्मिक उत्साहात पार पडला. आज पहाटे ४ वाजता घंटानाद करून ४ते ५ पाद्य पूजा, ५ले६ काकड आरती, सकाळी लघु रुद्र अभिषेक, पोषाख आणि देवाची अलंकार महापूजा बांधण्यात आली.
सकाळी १०ते१ या वेळेत पुण्य वचन , मातृकापूजन नवग्रह पुजन, क्षेत्रपाल पुजन ,होमहवन झाले, यावेळी पूरोहीत यांनी मंत्र पठण केले.दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत जोतिर्लिंग भजनी मंडळ यांचे भजन आणि डवरी गीतांचा कार्यक्रम झाला.सांयकाळी ६ वाजता काळभैरव जन्म काळ सोहळा मंदिरात पार पडला. यावेळी श्रींचे पूजारी यांच्या प्रमूख उपस्थितीत आणि गावकरी, ग्रामस्थ, पूजारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत काळभैरव जन्मकाळ सोहळा संपन झाला. यावेळी महिलांनी पाळणा गीत म्हटले. भाविकांनी गूलाल, फुलांची उधळण करत चांगभलंचा गजर केला.काळभैरवाची पारंपारीक भैरवं रूपात पूजा बांधण्यात आली होती.ही पूजा सुमित भिवंदरणे, गणेश झुगर, विनायक ठाकरे, तानाजी चिखलकर, प्रवीण झुगर, तुषार झुगर, अजित भोरे, रघुनाथ ढोले, यांनी बांधली तर जोतिबाची आज चतूर्भूज रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा अंकुश दादर्णे, ओमकार सांगळे, विकास ठाकरे, महालिंग शिंगे, बाळू सांगळे, नितीन लादे, उत्तम भिदरणे यांनी पूजा बांधली, काळभैरव नावानं चांगभलं चा गजर करत सूंटवडा वाटप केला,फटाक्यांची आतिषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली.भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला . मंदिराची रंगरंगोटी , सभा मंडप ‘ विद्युत रोषणाई करण्यात आली होती . यावेळी भावीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






