पन्हाळा : प्रतिनिधी
वारणानगरच्या सुराज्य फौंडेशनच्या वतीने युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या गुणवंतांचा व्हिजन २०२५ गौरव सोहळा या वर्षी शनिवारी २८ जूनला वारणानगर येथे होणार असल्याची माहिती सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वारणा समुहाचे अध्यक्ष डॉ.विनय कोरे संस्थापक असलेल्या सुराज्य फौंडेशन या संस्थेमार्फत गेली १८ वर्षे या व्हिजन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. महराष्ट्रातील ८० हून अधिक विद्यार्थी यावर्षी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विविध जिल्ह्यातील ३५ हून अधिक यशवंत उपस्थित राहणार असल्याची माहिती सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी २८ जुनला दुपारी १ वाजता कार्यक्रम होणार आहे.
येणा-या सर्व यशवंतांना कोल्हापुरी फेटा, स्मृती चिन्ह देवून वारणा विविध उदयोग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे पत्रकार बैठकीत सांगितले आतापर्यंत पाचशेहून अधिक यशवंतांचा सन्मान या ठिकाणी केला असल्याचेही सांगण्यात आले.
सन २०२५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेले यशवंतांचा सत्कार आयोजित केला असून या कार्यक्रमाचा सर्व स्तरातील लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला सुराज्य फौंडेशनचे सदस्य जीवनकुमार शिंदे, संदीप इंगळे, राजेंद्र पाटील, शंभो कुंभार उपस्थित होते .



