कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पारंपारिक इंधनामुळे प्रदूषण होते आणि याचबरोबर पारंपारिक इंधनाचे साठे भविष्यात संपुष्टात येणार म्हणून अपारंपारिक इंधानावर विविध प्रकारची वाहने चालविण्याचे प्रयोग सध्या जोरात सुरु आहेत. दुचाकी, चारचाकी, बस, जहाज, विमान, ट्रक्टर ही वाहने अपारंपारिक इंधनावर चालविण्याचे प्रयोग केले जात आहेत. यामध्ये काही प्रमाणात यशही आले आहे. विशेषत: यासाठी सौर उर्जेचा वापर केला जातो. मात्र आता रेल्वेही सौर उर्जेवर चालविण्याचे प्रयोग केले जात आहेत.
उत्तर प्रदेशातील वाराणशी शहरात रेल्वे ट्रॅक दरम्यान पोर्टेबल सौर पॅनेल बसविले आहेत. असा प्रयोग देशात पहिल्यांदाच केला गेला आहे. या सौर पॅनेलद्वारे निर्माण झालेल्या उर्जेतून रेल्वेही चालविण्यात येणार आहेत.
यापूर्वी देशात रेल्वे सौर उर्जेवर चालविण्यात आली आहे. अनेक रेल्वे स्थानके सौर उर्जेवर सध्या सुरु आहेत. दिल्लीतील सराय रोहिल्ला ते हरियाणामधील फारुख नगर दरम्यान २०१७ मध्ये पहिल्यांदा ट्रेन सौर ऊर्जेवर चालवण्यात आली. गुवाहाटी रेल्वे स्थानक ईशान्य भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेने पुणे, मुंबई, नागपूर आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. चेन्नईतील पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल स्थानक १०० टक्के सौर ऊर्जेवर चालते.
आता भारतीय रेल्वेने वेगळाच प्रयोग सुरु केला आहे. याला यशही येत आहे. यामध्ये पॅनेलला प्रखर ऊनही मिळेल आणि जागेची बचतही होईल. शिवाय ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी पॅनेल कधीही सहजपणे काढता येऊ शकतील. यातून निर्माण होणाऱ्या उर्जेतून रेल्वे धावणार आहे. शून्य वायू प्रदूषण होण्यासाठी भारतीय रेल्वेने हा उपक्रम हाती घेतला आहे. अधिक हिरवेगार आणि अधिक शाश्वत वाहतूक नेटवर्कच्या दिशेने त्यांच्या धोरणाचा भाग म्हणून सौरऊर्जेचा वेगाने अवलंब करत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून, उत्तर प्रदेशातील वाराणसी हे रेल्वे ट्रॅक दरम्यान पोर्टेबल सौर पॅनेल असलेले देशातील पहिले शहर बनले आहे.
बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सने वाराणसीने रेल्वे ट्रॅक दरम्यान बसवलेली भारतातील पहिली काढता येण्याजोगी सौर पॅनेल प्रणाली कार्यान्वित केली आहे. याविषयी रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे “बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसीने रेल्वे ट्रॅक दरम्यान भारतातील पहिली ७० मीटर काढता येण्याजोगी सौर पॅनेल प्रणाली (२८ पॅनेल, १५ किलोवॅट) कार्यान्वित केली – हिरव्या आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीच्या दिशेने एक पाऊल.
——————————————————————————————-



