कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२५-२६ या अर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस.सावंत यांनी केले आहे.
अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदु-खाटीक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम यांच्यासाठी योजना- वेबसाईट http://mahadisha.mpbcdc.in
अनुदान योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – ८०, अर्थिक – ४० लाख, ही योजना ५० हजार रुपये पर्यंत असून त्यामध्ये २५ हजार रुपये हे अनुदान तर २५ हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांला दिले जाते.
बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – ८०, अर्थिक -अनुदान ४० लाख रुपये व बीजभांडवल १७० लाख रुपये. ही योजना ५० हजार १ ते ५ लाखापर्यंत असून बँकेची ७५ टक्के रक्कम , लाभार्थीचा सहभाग ५ टक्के व महामंडळाचे बीजभांडवल २० टक्के यामध्ये ५० हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर ४१६००३, फोन नं. ०२३१- २६६३८५३ येथे संपर्क साधावा.
————————————————————————————-