श्रावणषष्ठी यात्रा आढावा बैठक : 30 जुलै रोजी होणार चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा..

0
177
A review meeting was held today at the police post at Jotiba Dongar under the chairmanship of Panhala Shahuwadi Sub-Divisional Officer Sameer Shingte regarding the planning of the Shravan Shashthi Yatra of Chopdai Devi at Jotiba Dongar on July 30.
Google search engine

पन्हाळा : प्रतिनिधी

श्री क्षेत्र जोतिबा डोंगर श्रावण षष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २३ जुलै पर्यंत अतिक्रमण काढण्याचे आदेश शाहुवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिला. जोतिबा डोंगरावर ३० जुलै रोजी श्रावण षष्ठी यात्रा होणार आहे या यात्रेच्या नियोजना संदर्भात आज जोतिबा डोंगर येथे आढावा बैठक घेण्यात आली. 

जोतिबा डोंगर येथील चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा ३० जुलै रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रा नियोजना संदर्भात आज जोतिबा डोंगर येथील पोलीस चौकीत पन्हाळा शाहुवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. चैत्र यात्रेनंतरची ही यात्रा सर्वात मोठी यात्रा भरते. चैत्र यात्रेप्रमाणे श्रावण षष्ठी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर येत असतात. अंदाजे तीन ते चार लाख भावीक डोंगरावर येतील यां दृष्ठिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

बैठकीत यात्रे पूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्याचे महावितरण कंपनीला आदेश दिले. धोकादायक कठड्यांना रेलिंग बसविणे स्वच्छतागृहाची संख्या वाढविणे,दर्शन रांगा, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या पावसाळयांचे दिवस असलेने अपघात दुर्घटनेच्या पाश्वभूमीवर बैठकीत वहातुक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा झाली. घाट मार्गत दाट धुके आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. संरक्षक कठडे, साईड पट्ट्या मजबूती करण, दुभाजक पट्टे मारणे, सूचना फलक लावणे आदी कामांसंदर्भात सुचना दिल्या. २३ जुलै पर्यंत अतिक्रमण काढून सर्व परिसर रिकामे करण्याचे आदेश पन्हाळा शाहुवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनाला दिले.

१५ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत यात्रा नियोजनाच्या कामांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे आढावा घेणार आहेत. आज पार पडलेल्या बैठकीवेळी पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, प्रशाशक अभिजित गावडे, ग्रामविकास अधीकारी विठ्ठल भोगम, जोतिबा देवस्थान समितीचे व्यावस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here