spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगशिरोली औद्योगिक वसाहतीत सेवा रुग्णालय

शिरोली औद्योगिक वसाहतीत सेवा रुग्णालय

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

स्मॅक भवनाच्या शेजारील घनकचरा प्रकल्पाला पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहेत. तसेच ईएसआय अंतर्गत सुरू असणाऱ्या सेवा रुग्णालयासाठी शिरोली औद्योगिक वसाहतीत एक एकर जागा देण्याची मागणीही करण्यात आली. याचा विचार करून मंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत.

शिरोली औद्योगिक वसाहत मधील घनकचरा प्रकल्प आणि अन्य औद्योगिक अडचणींचा निराकरण करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथील उद्योग विकास आयुक्तांच्या कक्षात बैठक घेतली. या बैठकीत कोल्हापूर मधील विविध औद्योगिक संघटना आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) च्या वतीने अध्यक्ष राजू पाटील यांनी सभासद उद्योजकांच्या दोन प्रमुख अडचणी मांडल्या. शिरोली ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्यामुळे स्मॅक शेजारी दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे माशा व भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ईएसआय अंतर्गत सुरू असणाऱ्या सेवा रुग्णालयासाठी शिरोली औद्योगिक वसाहतीत एक एकर जागा देण्याची मागणीही करण्यात आली. या दोन्ही मागण्यांचा विचार करून मंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत.
याचवेळी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( गोशिमा ) ने औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दल व मूलभूत सुविधा केंद्रावरील दंड माफ करण्याची मागणी केली. यापैकी अग्निशमन दलासाठी मंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दिला, तर दंड माफी संदर्भातील निर्णय संबंधित विभागाकडे सोपवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन ने उद्यमनगर येथील उद्योग विस्तारासाठी जागा नसल्याने उपलब्ध जागेत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. याशिवाय अंडरग्राउंड केबल आणि सांडपाण्याचा निचरा सुधारण्याची, तसेच उद्यमनगरमधील रस्त्यांच्या दर्जा सुधारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीत सहमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशावह, औद्योगिक विकास महामंडळाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता के. एस. भांडेकर, कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, तसेच उद्योजक बदाम पाटील, शेखर कुसाळे, सुनील शेळके आदी उपस्थित होते. मंत्री सामंतांच्या सूचनांनंतर शिरोली औद्योगिक वसाहतीतील वातावरण अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि विकासास अनुकूल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments