spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeअध्यात्मअखंड भारताची सात वेळा झाली होती फाळणी

अखंड भारताची सात वेळा झाली होती फाळणी

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

एक काळ होता, जेव्हा अफगाणिस्तानपासून ते म्यानमारपर्यंत पसरलेल्या भूप्रदेशाला भारतम्हटले जायचे. मात्र, ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणात्मक आणि राजकीय स्वार्थामुळे, या भूप्रदेशाची सात वेळा फाळणी झाली. १८७६ पासून १९४७ पर्यंत, केवळ ६१ वर्षांत या प्राचीन देशाचे सात तुकडे झाले.

फाळणीचा इतिहास : एक नजर

१) अफगाणिस्तान – १८७६   

ब्रिटिश साम्राज्याने आपले रक्षणात्मक परिघ तयार करण्यासाठी अफगाणिस्तानला भारतापासून वेगळे केले. ‘ड्युरंड रेषा’ ही त्याची सीमारेषा बनली.अफगाणिस्तानला भारतापासून वेगळं करून “बफर स्टेट” म्हणून विकसित केलं, रशियाशी असलेल्या संघर्षात स्वतःसाठी संरक्षणरक्षक म्हणून वापरण्याचा हेतू होता. अखंड भारताच्या पश्चिमेकडचा हा पहिला तुकडा. अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते. अफगाणिस्तान हा एक शैव देश होता. महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे. कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता. कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते. तो भारताचा एक भाग होता. १८७६ ​​मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला. करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.

२) नेपाळ – १९०४ 

 हिमालयात वसलेले हिंदू राष्ट्र नेपाळ, ब्रिटिशांच्या हस्तक्षेपातून आणि स्थानिक शासकांच्या मदतीने स्वतंत्र अस्तित्वात आले. भारताच्या सीमाशुल्क आणि संरक्षण व्यवस्थेपासून तो वेगळा करण्यात आला. नेपाळ हा हिमालयीन प्रदेश ब्रिटिशांच्या प्रभावाखाली असतानाही १९०४ मध्ये त्याला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला. ब्रिटिशांनी त्याचा वापर तिबेटी व्यापारावर प्रभाव ठेवण्यासाठी केला. नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे. भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे. १९०४ मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले. काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे. सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता. १९५१ मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.

३) भूतान – १९०६ 

– भूतानला ‘प्रोटेक्टोरेट’ म्हणून घोषित करून ब्रिटिशांनी त्याचे परकीय व्यवहार आपल्या हातात घेतले. पण देश स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्य झाला. भूतानला स्वतंत्र मान्य करून त्याचा संरक्षणात्मक व परराष्ट्र धोरणांचा ताबा ब्रिटिशांनी ठेवला. भारतापासून वेगळा करताना त्याला “राजकीय संरक्षण” या नावाखाली नियंत्रित केले गेले. १९०६ मध्ये ब्रिटिशांनी भूतानला भारतापासून वेगळे केले आणि एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. भूतान हा संस्कृत शब्द भू-उत्थान या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ उंच जमीन आहे.

४) तिबेट – १९०७ 

 ब्रिटिशांनी चीनशी करार करून तिबेटला भारतापासून वेगळे केले. त्यामुळे बौद्ध धर्माची महान भूमी भारताच्या नैतिक, धार्मिक प्रभावातून दूर गेली. तिबेटी प्रदेश ब्रिटिश प्रभावाखाली असूनही १९०७ मध्ये चीनशी संधि करून तिबेट भारतापासून दूर केला गेला. ही फाळणीही राजकीय हेतूने चीनला खुश करण्यासाठी केली गेली. तिबेटचे प्राचीन नाव “त्रिविष्ठम” होते आणि ते दोन भागांमध्ये विभागले गेले होते. १९०७ मध्ये चिनी आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या करारानंतर एक भाग चीनला आणि दुसरा भाग लामाला देण्यात आला. १९५४ मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिबेटला चीनचा एक भाग म्हणून स्वीकारले जेणे करून चिनी लोकांना एकता दाखवता येईल. पुढे चिनी राजवटीने तो भाग सुद्धा बळजबरीने ताब्यात घेतला.

५) श्रीलंका (सिलोन) – १९३५ 

– तत्कालीन ब्रिटिश सिलोनला भारतापासून स्वतंत्र वसाहत म्हणून घोषित केले. व्यापार, सागरी साखळी आणि संस्कृती यावर मोठा परिणाम झाला. सीलोन (आजची श्रीलंका) हा भारताचा समुद्रसपाटीवरचा शेजारी, ब्रिटीश भारताचा भाग होता. पण १९३५ मध्ये स्वतंत्र कॉलनी म्हणून घोषित करत त्यालाही वेगळं करण्यात आलं. श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते. सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.

६) म्यानमार (बर्मा) – १९३७

 भारताचा एक महत्त्वाचा पूर्वेकडील भाग असलेला बर्मा वेगळा करून स्वतंत्र ब्रिटिश वसाहत केली गेली. अनेक भारतीयांनी तेथे स्थलांतर केले होते, पण फाळणीने संबंध तुटले. ब्रिटिशांनी १९३७ मध्ये म्यानमारला भारतापासून विभक्त केलं. आर्थिक व धोरणात्मक स्वार्थातून हा निर्णय घेतला गेला. यामुळे भारताच्या पूर्वेस अजून एक तुकडा वेगळा झाला. म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते. १९३७ मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली. प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.

७) पाकिस्तान – १९४७ 

– भारताची सर्वात वेदनादायक फाळणी. धार्मिक आधारावर भारत-पाकिस्तान असे विभाजन झाले. लाखो लोकांचे विस्थापन, आणि लाखो बळी. हा इतिहास अजूनही भारताच्या जखमा ठसठसत ठेवतो. १९४७ मध्ये भारताचे दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. ही सर्वात अधिक रक्तरंजित आणि व्यापक फाळणी ठरली. हिंदू-मुस्लिम तणाव, राजकीय स्वार्थ आणि ब्रिटिशांची “फोडा आणि राज्य करा” नीती या फाळणीस कारणीभूत ठरली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आला. मोहम्मद अली जिना १९४० पासून धर्माच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी करत होते जे नंतर पाकिस्तान बनले. १९७१ मध्ये भारताच्या सहकार्याने पाकिस्तानचे पुन्हा विभाजन झाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला. पाकिस्तान आणि बांगलादेश पुर्वीच्या भारताचे भाग ऊरले आहेत.

ब्रिटिश राजवटीने “फाळणीचे शस्त्र” वापरत अखंड भारताचे सात वेगवेगळे तुकडे केले. प्रत्येक वेळी काही ना काही राजकीय, व्यापारी, किंवा सामरिक कारण पुढे केले गेले. आज या सर्व फाळण्या स्वतंत्र राष्ट्रे बनली असली तरी, भारताशी त्यांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अजूनही मजबूत आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. ब्रिटिशांच्या फाळणी धोरणाने उपखंडात स्थायित्व कमी आणि संघर्ष वाढवले.

 फाळणीमागील प्रमुख हेतू :

  • “Divide and Rule” नीती : विविध जाती, धर्म, प्रदेशांमध्ये फूट घालून ब्रिटिशांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले.
  • राजकीय संरक्षण : अफगाणिस्तान, तिबेटसारख्या सीमेवरच्या प्रदेशांना वेगळे करून ब्रिटिशांनी आपला संरक्षण परिघ निर्माण केला.
  • संपत्तीचे केंद्रीकरण : व्यापारिकदृष्ट्या उपयुक्त प्रदेश स्वतंत्र ठेवून, भारतातील संपत्तीचे नियंत्रण अधिक सुलभ केले.

 अखंड भारताचे स्वप्न : केवळ कल्पना ?

आजही अनेक विचारवंत, इतिहासकार आणि राजकीय कार्यकर्ते ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा पुनरुच्चार करतात. मात्र सत्य हे आहे की, भूतकाळातील फाळणींनी उपखंडाला नवे राष्ट्रराज्य दिले आहेत, जी आज स्वतंत्र, सार्वभौम देश म्हणून कार्यरत आहेत.

भारताची फाळणी केवळ १९४७ मध्ये झालेली नसून, ती सात वेळा झाली आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक हेतूंमुळे. या सात फाळण्यांनी एक अखंड, समृद्ध भारताचे स्वप्न मोडले… आणि आजचे विविध स्वतंत्र राष्ट्र तयार केले.

इतिहास केवळ जाणून घेण्यासाठी नाही, तर त्यातून शिकण्यासाठी असतो — आणि अखंडतेची किंमत समजून घेण्यासाठी, या फाळणीचा अभ्यास आवश्यक आहे.

अखंड भारताची फाळणी :

पूर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

१८५७ मधे भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते आणि सध्या ३३ लाख चौरस किमी आहे.

वर्ष १८५७ ते  १९४७ या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग :

१) थायलंड : थायलंडला १३९३ पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते. अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले. आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.

२) कंबोडिया : कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे, हा अखंड भारताचा भाग होता. भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले. येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे. राष्ट्रभाषा संस्कृत होती. कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात. जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.

३) व्हिएतनाम : व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती. अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील. येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची. लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.

४) मलेशिया : मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते. हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे. मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत. मलय देशात शैव धर्म पाळला जात होता. देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची. येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.

५) इंडोनेशिया : इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश . तेथे हिंदू राजांचे राज्य होते. सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.

सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

संस्कृतचे ५२५ श्लोक असलेले भुवनकोश हे सर्वात जुने पुस्तक आहे.

इंडोनेशियाच्या अग्रगण्य संस्थांची नावे किंवा मोटो अजूनही संस्कृतमध्ये आहेत.

इंडोनेशिया राष्ट्रीय सशस्त्र दल – त्रिधर्म एक कर्म

इंडोनेशिया एअरलाइन्स – गरुड एअरलाइन्स

इंडोनेशिया गृह मंत्रालय – चरक भुवन

इंडोनेशिया वित्त मंत्रालय – नगर धन रक्षा

इंडोनेशिया सर्वोच्च न्यायालय – धर्मायुक्ती

————————————————————-

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments