किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर..

0
113
Sagar Shankar Kondekar from Kagal taluka was elected as the Kolhapur district president of the All India Kisan Congress.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कागल तालूक्यातील सागर शंकर कोंडेकर यांची निवड करण्यात आली. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांनी त्यांची नियुक्ती केली असून खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कोंडेकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोंडेकर यांचे अभिनंदन करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न किसान काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण अहोरात्र कार्यरत रहा, अशा सूचना दिल्या. अखिल भारतीय किसान काँग्रेसला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापन झालेल्या किसान काँग्रेसने देशातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लाखो लढे लढत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सागर कोंडेकर यांचा शेतकरी प्रश्नांवर चांगला अभ्यास आहे, त्यामुळे ते या पदाला न्याय देतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here