पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
दर वर्षी पावसाळ्यात महापूर आला की हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला जणांवरासह स्थलांतरीत व्हावं लागतं. निलेवाडी येथे संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने रेस्क्यू फोर्सच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनचे साहित्य, बोटिंगचा सराव चाचणी आणि नदीपात्रात प्रात्यक्षिक घेण्यात आली. यावेळी रबरी बोटमध्ये बसून अधिकाऱ्यांनी वारणा नदी पात्रात प्रात्यक्षिक घेण्यात आली.
यावेळी निलेवाडीचे सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, ग्रामपंचायत सदस्य दीपक शिंदे, वडगांव उत्पन्न बाजार समितीचे सुभाष भापकर,वाठारचे मंडल अधिकारी अमित लाड, ग्राम महसूल अधिकारी शैलेश कुईगडे, ग्रामविकास अधिकारी अनुपमा सिदनाळे, जीवन ज्योती रेस्क्यू फोर्सचे सुनील जाधव,रोहित मिटके, यश गिडवाणी,सचिन कळके, अनिल वाघरे आदी उपस्थित होते.