कोल्हापूर : प्रसारमाध्यमन न्यूज
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिक मुला व मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पन्हाळा आणि सैनिक आरामगृह कोल्हापूरसाठी अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक १६ जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून विहीत नमुन्यातच अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूरसाठी सहायक वसतिगृह अधिक्षक /सुरक्षा सुपरवायझर एंव सहायक व्यवस्थापक-२/ लिपीक – पदांची संख्या २ (पुरुष), एकत्रित मानधन- २४ हजार ४७७ रुपये.
स्वयंपाकी- पदांची संख्या ५ (महिला), एकत्रित मानधन- १३ हजार ९२४ रुपये
सफाई कर्मचारी – पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन- १३ हजार ८९ रुपये
पहारेकरी पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन- २० हजार ८८६ रुपये.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूरसाठी वसतिगृह अधिक्षका -पदाची संख्या १ (महिला), एकत्रित मानधन- ३१ हजार ३६५ रुपये
वसतिगृह सहायक अधिक्षका- पदांची संख्या ३ (महिला), एकत्रित मानधन- २४ हजार ४७७ रुपये
पहारेकरी- पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन २० हजार ८८६ रुपये
स्वयंपाकी- पदांची संख्या ६ (महिला), एकत्रित मानधन- १३ हजार ९२४ रुपये
सफाई कर्मचारी- पदाची संख्या १ (महिला), एकत्रित मानधन- १३ हजार ८९ रुपये
माळी – पदाची संख्या १ (महिला/पुरुष), एकत्रित मानधन- १३ हजार ८९ रुपये
सैनिक मुलांचे वसतिगृह, पन्हाळासाठी पदाचे नाव -वसतिगृह अधिक्षक/ अशासकीय सहायक व्यवस्थापक -पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन- ३१ हजार ३६५ रुपये
पहारेकरी- पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन – २० हजार ८८६ रुपये
सैनिक आरामगृह, कोल्हापूरसाठी सफाई कर्मचारी- पदाची संख्या १ (पुरुष), एकत्रित मानधन -१३ हजार ८९ रुपये इत्यादी रिक्त पदे आहेत.
प्राप्त अर्जांची पडताळणी करुन पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी मोबाईलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल क्रमांक ९१७२०३५६१२ व दुरध्वनी क्रमांक ०२३१- २६६५८१२ वर संपर्क साधावा.






