कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून जसा पाऊस वाढत गेला तसाच हळूहळू कमी होत आहे. गेल्या मंगळवारी पावसाने जिल्ह्यातच नव्हे राज्यातील बहुतांशी भागात हाहाकार उडवला. पाऊस अगदी टोक गाठायला आला होता. मात्र दुसऱ्या दिवसापासून पावसाने उघडीप दिली. यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये महापुराच्या विळख्यातून वाचले. आज तर कोल्हापुरात ऊन पडले आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर इथं पावसाचा जोर अंशत: वाढणार असून, काही गावांमध्ये पूरस्थितीची चिंता सतावू शकते. तर, तिथं मराठवाड्यामध्ये हिंगोली, जालना, परभणीमध्ये हलक्या सरींची शक्यता सूचित होते.
ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पावसाची दमदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आणि याच अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरांसह राज्याच्या इतरही भागांमध्ये पावसानं चांगलाच जोर धरला. कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच राज्यातील धरण क्षेत्रांमध्ये झालेल्या पावसामुळं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला आणि नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. तिथं धडकी भरवणारा आणि अजस्त्र लाटांचा मारा करणारा समुद्र चिंतेत भर टाकतच होता. मागील २४ तासांपर्यंत दिसणाऱ्या या चित्रात फारसा बदल झाला नसला तरीही पावसाचा जोर मात्र ओसरला आणि हीच मोठी दिलासायक बाब.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि गोव्यापर्यंत मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुर्गम भागांमध्ये पावसाच्या तुरळक ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर इथं पावसाचा जोर अंशत: वाढणार असून, काही गावांमध्ये पूरस्थितीची चिंता सतावू शकते. तर, तिथं मराठवाड्यामध्ये हिंगोली, जालना, परभणीमध्ये हलक्या सरींची शक्यता सूचित होते. विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
—————————————————————————————————