‘लेदर डिझायन’ मधून राघवने उभारले कोट्यवधीचे साम्राज्य

0
341
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

राघव कपूर यांची कहाणी एक प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी, आवड आणि परिस्थितीवर मात करण्याच्या ताकदीचं राघव हे एक प्रतीक आहेत. त्यांनी बारावी नंतर औपचारिक शिक्षण सोडलं, आणि त्यानंतर आपली आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एका कॉल सेंटरमध्ये फक्त १२ हजार पगाराची नोकरी स्वीकारली. मात्र ते नोकरीत फार दिवस रमले नाहीत. राघवने स्वतःचा लेदर डिझायन ब्रँड फायनलाईन्सचा  व्यवसाय सुरू केला. लेदर डिझायन या व्यवसायातून राघवने उभारले कोट्यवधीचे साम्राज्य !

राघव कपूर हे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी बारावी नंतर औपचारिक शिक्षण सोडलं, आणि त्यानंतर आपली आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी एका कॉल सेंटरमध्ये फक्त  १२ हजार पगाराची नोकरी स्वीकारली. तेव्हा त्यांच्या हातात कुठलीही विशेष कौशल्यं नव्हती, ना कोणतं मोठं नेटवर्क – पण होती ती प्रचंड इच्छाशक्ती आणि काही तरी वेगळं करून दाखवायची अथक प्रयत्न.

राघवसाठी कॉल सेंटरची नोकरी सोपी नव्हती. त्यांची ही अवस्था पाहून त्यांचे मेहुणे वरुण जॉली यांनी त्यांना त्यांच्या ‘टेक्स्ट हॉर्स’ नावाच्या छोट्या एक्सपोर्ट व्यवसायात काम करण्याची संधी दिली. तेथे राघवला घोड्यांसाठी लगाम, पट्टे, काठी यांसारख्या चामड्याच्या वस्तू डिझाइन करण्याची संधी मिळाली. जवळपास आठ वर्षे राघवनं १४-१६ तास काम करून चामड्याला सुंदर डिझाइन आणि पॅटर्नमध्ये बदलण्याची कला शिकली. या अनुभवामुळे त्यांना चामड्याच्या डिझाइनची सखोल माहिती मिळाली, जी त्यांच्या भविष्यातील उद्योगाचा पाया बनली. ते आजही ‘टेक्स्ट हॉर्स’ सोबत डिझायनर म्हणून जोडलेले आहेत.

क्लासरूमच्या बाहेरचं शिक्षण घेत राघव यांनी व्यवसाय, बाजारपेठ, ग्राहक वर्तन, आणि लेदर इंडस्ट्रीचं मूळ समजून घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कोणतीही फॉर्मल ट्रेनिंग घेतली नाही – पण प्रत्यक्षात काम करताना अनुभव घेऊन आणि इंटरनेट, पुस्तकं, लोकांकडून शिकत त्यांनी स्वतःचं ज्ञान विकसित केलं.

राघवने स्वतःचा लेदर डिझायन ब्रँड फायनलाईन्सचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी स्वतः नमुने बनवले, डिझाइन्स तयार केली, स्थानिक कारागिरांशी संवाद साधून त्यांची मदत घेतली. क्वालिटी, कस्टमर फीडबॅक, आणि नाविन्यपूर्ण डिझाइन्स यावर भर देत त्यांनी हळूहळू लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

सुरुवातीला एका छोट्या वर्कशॉपमधून सुरू झालेला फायनलाईन्स आता एक यशस्वी ब्रँड आहे. त्यांच्या उत्पादनांना देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी आहे. आज या ब्रँडचा टर्नओव्हर कोट्यवधी रुपयांमध्ये आहे – ही त्यांच्या अथक मेहनत, चिकाटी, आणि ग्राहकांच्या विश्वासाची फलश्रुती आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here