नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोदी सरकारनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘ पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना ’ लागू झाल्याची घोषणा केली. या योजनेतून पुढील दोन वर्षांत तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची घोषणा
१ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. आता १५ ऑगस्ट २०२५ रोजी मोदींनी जाहीर केले “आज १५ ऑगस्ट आहे आणि आम्ही देशातील तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की, पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू होत आहे.”
योजनेची वैशिष्ट्ये
-
खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
-
रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.
-
योजनेसाठी एकूण ९९.४४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
-
दोन वर्षांत ३.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या तयार करण्याचे उद्दिष्ट.
कोणाला मिळणार लाभ ?
-
१८ ते २९ वयोगटातील भारतीय तरुण.
-
पहिल्यांदाच नोकरी मिळवलेले युवक-युवती.
-
पगार जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत असणारे कर्मचारी.
-
१ ऑगस्ट २०२५ नंतर पहिली नोकरी सुरू केलेल्या तरुणांनाच लाभ मिळेल.
योजनेची मुदत
-
योजना ३१ जुलै २०२७ पर्यंत लागू राहणार.
-
१ ऑगस्ट २०२५ नंतर नोकरी लागलेल्या तरुणांना हाच लाभ.
रक्कम कधी आणि कशी मिळेल ?
-
EPFO मध्ये पहिल्यांदा नोंदणी झालेल्या तरुणांना १५,००० रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातील.
-
६ महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता.
-
१२ महिने नोकरी पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता.
-
-
म्हणजेच, पूर्ण एक वर्ष नोकरी टिकवली तर तरुणांना १५,००० रुपयांचा थेट फायदा होईल.
अर्ज कुठे करायचा ?
-
योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
-
नोकरी मिळाल्यानंतर आणि EPFO मध्ये रजिस्ट्रेशन झाल्यावर उमेदवार आपोआप पात्र ठरेल.
कंपन्यांना मिळणारे प्रोत्साहन
-
कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी ( ज्याचा पगार जास्तीत जास्त १ लाख रुपये असेल आणि ज्याने किमान ६ महिने नोकरी केली असेल ) २ वर्षांपर्यंत दर महिना ३,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहन.
-
उत्पादन ( मॅन्युफॅक्चरिंग ) क्षेत्रात हे प्रोत्साहन तिसऱ्या व चौथ्या वर्षापर्यंतही मिळणार.
थोडक्यात, मोदी सरकारची ही योजना केवळ तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणारी नाही, तर पहिली नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाला १५ हजार रुपयांची मदत आणि कंपन्यांना प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. त्यामुळे तरुणांना सुरक्षित भविष्याची वाट आणि उद्योगांना सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होईल.
———————————————————————————————



