चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड तालुक्तांयातील बुळवाडी येथे गावातील एका खाजगी वायरमनला हाताशी धरून मीटर धाऱकांच्या परवानगी शिवाय महावितरण कंपनीने मिटरच्या कार्यप्रणालीविषयी ग्राहकांना माहिती न देताच त्यांच्या ठेकेदाराकडून मोफत स्मार्ट डिजिटल मीटर बसवित आहोत, असे सांगून गावाबाहेरील २६ मीटर बसविलेली आहेत, असा आरोप करून गावात तात्काळ ग्रामसभा बोलावून स्मार्ट डिजीटल मीटर बसविण्यास विरोध करून बसविलेली मीटर ताबोडतोब काढून घ्यावीत, असा ठराव करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य आर.आय.पाटील यांनी, “जर टी.ओ.डी. मीटर म्हणजे टाईम ऑफ डे मीटर बसविल्यास दिवसाच्या वेळेनुसार विजेचा दर बदलत असतो. सामान्यता पीक वेळ म्हणजे संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत विजेचा दर सर्वात जास्त असतो आणि ऑफ पीक वेळेत विजेचा दर कमी असतो. म्हणजे ग्राहकांने संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यत आणि सकाळच्या सत्रात विजेचा वापराला जास्त दर त्यामुळे घरात शुभकार्य , सणासुदीच्या दिवसात विज वापरावर बंधने येणार आहेत. तसेच अगोदरच महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा विजेच्या युनिटचा दर जास्त असून टीओडी स्मार्ट डिजिटल मीटर बसवल्यास ग्राहकांना नाहक बुर्दंड बसणार आहे”. अशी माहिती ग्रामस्थांना दिली.

“सध्या मीटर भाडे पोस्टपेड आहे पण भविष्यात मोबाईल रिचार्ज प्रमाणे प्रीपेड सक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सर्वच मीटर धारकांनी स्मार्ट डिजीटल मीटर बसविण्यास महावितरण कंपनीला विरोध करणे गरजेचे आहे असे आवाहन चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सचिव आर.आय. पाटील यांनी केले. याप्रसंगी श्रीनिवास पाटील ग्रामपंचायत सदस्य पी.एन. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली . या ग्रामसभेला अरुण आप्पाजी पाटील, उपसरपंच संजय महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंगोजी पाटील, नागोजी भोसले, शरद पाटील, धनाजी पाटील, शंकर जैनू पाटील, जयवंत सावंत सह गावातील सर्व मीटर धारक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






